Mon, Jul 16, 2018 17:42



होमपेज › Solapur › राईनपाडा हत्याकांडातील कुटुंबियांची विजयसिंह मोहिते पाटलांनी घेतली भेट 

राईनपाडा हत्याकांडातील कुटुंबियांची विजयसिंह मोहिते पाटलांनी घेतली भेट 

Published On: Jul 12 2018 10:29PM | Last Updated: Jul 12 2018 10:29PM



मंगळवेढा : तालुका  प्रतिनिधी
धुळे येथील राईनपाडा येथे झालेल्या हत्याकांडात मंगळवेढा तालुक्यातील खवे आणि मानेवाड़ी येथील नाथपंथी डवरी समाजाच्या ४ भिक्षुकाना प्राण गमवावे लागले. या बाबत माढा मतदार संघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी गुरुवारी खवे येथे भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले.

या वेळी भोसले कुटुंबियानी शासनाकडून घोषित आर्थिक मदत मिळाली नसल्याचे सांगितले म्हणून मयत असलेल्या व्यक्तीच्या अस्थी विसर्जित न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. हे ऐकताच विजयसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दूरध्वनी वरून संपर्क करत पीड़ित कुटुंबाना तात्काळ मदत करा अशी सुचना केली. यावर जिल्हाधिकारी भोसले यांनी प्रत्येक कुटुंबास दहा लाख आणि कुटुंबातील एका सदस्यास् शासकीय नोकरी निश्चित असल्याचे सांगितले.

या वेळी नाथपंथी डवरी समाजाचे ग्रामस्थ प्रांतिक सदस्य राहुल शहा सह मंगळवेढा राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.