Sun, Oct 20, 2019 06:06होमपेज › Solapur › पंढरपूरला निघालेल्या जीपच्या अपघातात ७ जखमी

पंढरपूरला निघालेल्या जीपच्या अपघातात ७ जखमी

Published On: Jul 12 2019 3:27PM | Last Updated: Jul 12 2019 3:16PM
म्हसवड : प्रतिनिधी 

पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या क्रुझर जीपला गुरुवारी सकाळी म्हसवड-मायणी रस्त्यावरील कुकुडवाड घाटात अपघात झाला. ही जीप घरावर जाऊन आदळल्याने जीपमधील सातजण जखमी झाले आहेत. जखमींवर वडूज येथे उपचार सुरु आहेत.

रमेश लक्ष्मण कळंत्रे (वय 42), सुगंधा रघुनाथ मोरे (वय 42), रमेश विष्णू मोरे (वय 42), अरुण लक्ष्मण मोरे (वय 40), सीता बाबासो मोरे (वय 40), सर्जेराव तातोबा चोरगे (वय 50), संतोष कृष्णा मोरे (वय 25, सर्व रा.शेंडेवाडी, कुंभारगाव, ता. पाटण), अशी  जखमींची नावे आहेत. हे सर्व जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. कुकुडवाड खिंडी दरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भुजंग महादेव जाधव यांच्या घरावर ही जीप जावून आदळली.

या अपघातात सात जण जखमी झाले. जखमींना मायणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी वडूज येथे पाठवण्यात आले आहे.