Sat, Sep 21, 2019 07:05होमपेज › Solapur › ग्रा.पं. सदस्यास मारहाण; चौघांवर गुन्हा

ग्रा.पं. सदस्यास मारहाण; चौघांवर गुन्हा

Published On: Jan 06 2018 1:28AM | Last Updated: Jan 05 2018 9:24PM

बुकमार्क करा
करमाळा : तालुका प्रतिनिधी

निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून ग्रामपंचायत सदस्याला वायरच्या हंटरने मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हनुमंत खरात असे मारहाण झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. हा प्रकार स्वामी बिराजदार यांच्या किराणा दुकानासमोर मांजरगाव ( ता. करमाळा) येथे गुरुवारी सकाळी 8 वाजता घडला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत साहेबराव खरात (रा. मांजरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. गोविंद खरात, विठ्ठल खरात, धर्मेंद्र खरात, जितेंद्र खरात (सर्व रा. मांजरगाव, ता. करमाळा) असे संशयित आरोपींची नावे आहेत.

गेल्या दोन महिन्यापूर्वी तालुक्यात 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये मांजरगाव येथेही निवडणूक झाली होती. यावेळी हनुमंत खरात हे निवडणुकीमध्ये सदस्य पदासाठी उभा राहिले व निवडून आले होते. तर त्यावरून एकदा भांडणेही झाली होते. त्यावेळी दोन्ही गटाची मध्यस्थीने भांडण मागे घेतली होती, तर त्याच वेळचा राग मनात धरून गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास विरोधी गटातील कार्यकर्त्यांनी वायरचा हंटर आणि लोखंडी चेनने मारून जखमी केले आहे. याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पर्वते करीत आहेत.