Thu, May 28, 2020 12:54होमपेज › Solapur › आषाढी एकादशीनिमित्त भीमा तिरी उसळला भक्तीचा सागर

आषाढी एकादशीनिमित्त भीमा तिरी उसळला भक्तीचा सागर

Published On: Jul 12 2019 10:13AM | Last Updated: Jul 12 2019 10:56AM
पंढरपूर : प्रतिनिधी

पांडुरंगाच्या आंतरिक ओढीने गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतून पायी चालत निघालेले लाखो वैष्णवांचे भार पंढरीत दाखल झालेले आहेत. आज (दि.१२) साजर्‍या होत असलेल्या आषाढी एकादशीसाठी सुमारे 10 लाखांहून अधिक वारकर्‍यांच्या मांदियाळीने पंढरी नगरी अक्षरश: दुमदुमून गेली आहे. 

अधिक वाचा : जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात : मुख्यमंत्र्यांची  विठ्ठला चरणी प्रार्थना

अधिक वाचा : आषाढीसाठी पंढरीत 10 लाखांवर भाविक

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर विट्ठल दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली आहे. पहाटेपासूनच हजारो दिंड्या आणि लाखो वारकऱ्याची चंद्रभागा नदीत स्नानासाठी गर्दी उसळली आहे. चंद्रभागा स्नान, नामदेव पायरीचे दर्शन, नगर प्रदक्षिणा करून पंढरीची वारी पोहोचवली जात आहे. पंढरपूर शहरात सर्वत्र टाळ, मृदंगाच्या गजराने वातावरण वैष्णवमय झाले आहे. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखी सोहळ्यानाही चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा करण्यास सुरुवात केली आहे.