Tue, Sep 17, 2019 04:47होमपेज › Solapur › ‘शेळीला शेतात सोडले, म्हणून दगडाने ठेचले’

’शेळीला शेतात का सोडले म्हणून दगडाने ठेचले’

Published On: Dec 16 2017 1:50AM | Last Updated: Dec 17 2017 1:32AM

बुकमार्क करा

करमाळा : तालुका प्रतिनिधी 

किरकोळ कारणावरून भावाने भावाच्या डोक्यात वीटकर मारून गंभीर जखमी केल्याचा प्रकार कोळगाव (ता. करमाळा) येथे घडला आहे. शेळीला शेतात का सोडले, या कारणावरुन लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात वीटकर मारुन गंभीर जखमी केल्याचा गुन्हा 12 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता कोळगाव (ता. करमाळा) येथे घडला आहे.

बापू दादा जाधव (वय 60)  व त्याची  पत्नी शोभा बापू जाधव (वय 55, रा. दोघेही कोळगाव) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचारानंतर (16) करमाळा पोलिस ठाण्यात संशयित दोनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण दादा जाधव व मीराबाई कल्याण जाधव (दोघेही रा. कोळगाव, ता. करमाळा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

बापू दादा जाधव (वय 60) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. 12 रोजी सकाळी दहा वाजता कोळगाव येथील घरी असताना बापू जाधव यांचा लहान भाऊ कल्याण याने बापू यांची पत्नी शोभास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि तुमच्या शेळ्या तुम्हाला सांभाळता येत नाहीत का, आमच्या शेतात तुमच्या सुनेने शेळी का सोडली, असे बोलत दमदाटी करु लागला.

यावेळी वीट  डोक्यात मारल्याने बापू जाधव हे जखमी झाल्यानंतर मीराबाई जाधव यांनी बापू यांच्या पत्नी शोभास  लाथाबुक्क्ययाने मारहाण केली. त्याच दिवशी याबाबत करमाळा पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन आज शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कल्याण जाधव यांच्यासह त्यांच्या पत्नी मीराबाई यांच्यावर मारहाण शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार सचिन आतकर हे करत आहेत.
 

 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex