Mon, Sep 16, 2019 06:10होमपेज › Solapur › फायनान्सच्या कार्डवरुन 96 हजारांची फसवणूक

फायनान्सच्या कार्डवरुन 96 हजारांची फसवणूक

Published On: May 13 2018 2:18AM | Last Updated: May 12 2018 10:26PMसोलापूर : प्रतिनिधी

शेतकर्‍याला फोनद्वारे सर्व माहिती विचारून बजाज फायनान्सच्या कार्डवरुन 96 हजार रुपयांच्या वस्तूंची खरेदी करुन शेतकर्‍याची फसवणूक करणार्‍याविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तानाजी शिवाजी चव्हाण (वय 45, रा. संगमेश्‍वरनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. तानाजी चव्हाण यांच्या मोबाईल फोनवर 28  मार्च रोजी 7074379064 या क्रमांकाच्या मोबाईलवरुन नंबरवरून अनोळखी व्यक्तीने फोन केला. फोन करणार्‍या व्यक्तीने चव्हाण यांना त्यांची सर्व माहिती विचारून घेतली. चव्हाण यांनी बजाज फायनान्सकडून कोणतीही वस्तू विकत घेतलेली नाही. परंतु फोन करणार्‍या व्यक्तीने चव्हाण यांच्या माहितीवरुन बजाज फायनान्सच्या कार्डवर ऑनलाईन 95 हजार 839 रुपयांच्या वस्तूंची खरेदी करुन चव्हाण यांची फसवणूक केली म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.