Mon, Sep 16, 2019 05:56होमपेज › Solapur › मोहोळ तालुक्यातील ३९ गुन्हेगार निवडणूक कालावधीत तडीपार

मोहोळ तालुक्यातील ३९ गुन्हेगार तडीपार

Published On: Apr 11 2019 7:10PM | Last Updated: Apr 11 2019 6:59PM
मोहोळ : वार्ताहर

लोकसभा निवडणुकीच्या काळात मोहोळ तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मिर्माण होवू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने ३९ जणांना तडीपार केले. सोलापूर ग्रामीण विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी गुरुवारी हा आदेश दिल्‍याचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

मोहोळ तालुक्यातील विविध गावात अवैध दारु विक्री करणारे आणि पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांमुळे अशांतता निर्माण झाली होती. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया करुन देखील त्यांच्या वर्तनात कोणतीच सुधारणा होत नव्हती. त्यामुळे मोहोळचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता अधिनियम १९७३ चे कलम १४४(२) अन्वये तालुक्यातील ३९ जणांना तडीपार करावे, यासाठी वरीष्ठ पोलिस प्रशासनास प्रस्ताव पाठवला होता.

त्यानुसार पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुक्यातील ३९ गुन्हेगारांना १० एप्रिल ते १७ एप्रिल या आठ दिवसाच्या कालावधीत गावातून तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यात अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक कोकणे यांनी आदर्श आचार संहितेचा भंग होवू नये यासाठी ही कारवाई करण्यात आल्‍याचे सांगितले. तडीपार कालावधीत हे लोक गावात आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही कोकणे म्‍हणाले. त्यासाठी नागरिकांनी निर्भीडपणे पोलिसांना माहिती देण्याचे अवाहनही त्‍यांनी यावेळी केले आहे.

हे गुन्हेगार झाले तडीपार 
अन्सार अन्वर शेख (दत्तनगर मोहोळ), महेंद्र शिवाजी भोसले (आष्टी), भाऊराव केशव गुंड, रामचंद्र पांडुरंग नरके (खंडोबाचीवाडी), पांडुरंग सुदाम थोरात, हनुमंत उत्तम कदम (देवडी), सुधीर हनुमंत चवरे (पेनुर), विलास बबन सरपाळे, भिमराव सुखदेव वसेकर, भोलनाथ उर्फ बापु दत्तात्रय वसेकर (टाकळी सिकदंर), बाळु भिवा कदम (सय्यद वरवडे), बालाजी हनुमंत सलगर, अरुण प्रल्हाद वाघमोडे (नजिक पिंपरी), अशोक आप्पाराव वाघमोडे, बिरुदेव रेवणसिध्द वाघमोडे (कोळेगांव), राजु श्रीपती चव्हाण (आष्टे), नंदुकुमार विठ्ठल जाधव, भास्कर लिंबाजी खुर्द, राजु कृष्णा तुपसमिंदर, (गोटेवाडी), पंडीत सोमा नरुटे, मारुती श्रीमंत शिरगिरे, प्रदीप पंडीत नरुटे, ज्ञानेश्वर सुभाष व्यवहारे (लांबोटी), समाधान पांडुरंग शेळके, भगवान दादाराव शेळके, भरत गोवर्धन शिंगाडे (कोन्हेरी), विठ्ठल नवनाथ मते (चिखली), लखन जगदीश कोळी (मोहोळ), गणेश भागवत गुंड, दत्तात्रय भागवत उंबरे (अगनर), सर्जेराव शंकर पडवळकर, महादेव राजराम बचुटे (औंढी), बापु दत्तु क्षिरसागर (मोहोळ), संतोष महादेव कोळी (पापरी), नवनाथ बाळु टिंगरे (शिरापूर), विलास गोपीचंद गायकवाड (अंकोली), शिवराम विठ्ठल ढेरे, धनाजी शिवराम ढेरे (अर्जुनसोंड), तानाजी गोपिनाथ जगताप (खंडाळी).