Thu, May 28, 2020 17:58होमपेज › Solapur › उजनीतून सोलापूरसाठी भीमा नदीत ३४०० क्युसेकने पाणी सोडले

उजनीतून सोलापूरसाठी पाणी सोडले

Published On: May 16 2019 6:50PM | Last Updated: May 16 2019 9:21PM
सोलापूर : प्रतिनिधी 

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर शहरासाठी आज, गुरवारी सकाळी ६ वाजता १७०० क्युसेकने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यात गुरुवारी सकाळी १० वाजता ४ गाळमोऱ्यांमधून १७०० क्युसेक ने वाढ करत तो ३४०० क्युसेक करण्यात आले. तर सायंकाळ पर्यंत ते ७००० क्युसेक पर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधारा कोरडा पडत आल्यामुळे त्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदीकाठी व सोलापूरच्या औज बंधाऱ्यात पाणी संपत आल्याने सोलापूरकरांवर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाल्याने उजनीतून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय उजनी प्रशासनाला घेणे भाग पडले. धरणाच्या गाळमोरीतून ३४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. तो ७००० पर्यंत वाढवून ५ ते ५.५ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.

सोलापुर शहराला पाणी पुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नदीत पाणी सोडल्यामुळे नदीत ठिकठिकाणी असणाऱ्या बंधारेची दारे काढण्यात आले आहेत.

उजनीत राहिले केवळ ४३ टीएमसी पाणी

उजनी धरणात सध्यस्थितीत उपयुक्त पाणीसाठा केवळ ४३ टीएमसी राहिला आहे. यात २० ते २५  टीएमसी गाळ व रेतीच असल्याने उजनीत कैवळ २०.२१ टीएमसी पाणी राहिले आहे. ते ही मायनस पातळीतील आहे, उजनीतून भीमा नदीत आता ५.५ टीएमसी सोडले जाणार आहे. हे पाणी  सोडल्याने भीमा नदीकाठ व सोलापूरकरांसाठी पिण्याचा पाणीसाठा होणार आहे.

सध्या उजनी धरणाची पाणीपातळी पुढील प्रमाणे 

पाणी पातळी  : ४८७.५६०  मीटर .
एकूण साठा  : १२१८.६६ द .ल.घ.मी.
उपयुक्त साठा : वजा ५९४.१५ द.ल.घ.मी.
एकुण पाणी साठा : ४३. ०६ टीएमसी
उपयुक्त  पाणीसाठा :२०.९७ टीएमसी 

कालवा बेडपातळीवर केवळ दोन फुट पाणी

उजनी धरणाचा पाणीसाठा कमालीचा घटला असल्याने कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी बंद करावे लागले आहे. उजनीतून कालव्यात पाच दारातून सोडले जाते, परंतु, सध्या उजनीचे पाणी त्या पाच दाराच्या बेड पातळीच्या खाली गेल्याने उजनीतून कालव्याद्वारे पाणी सोडणे अशक्य झाले आहे. या अगोदरच उजनीतून बोगद्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद झाले आहे.