Wed, Jun 19, 2019 09:03होमपेज › Solapur › सोलापूर-विजापूर मार्गावरील दुर्घटना: अपघातात 2 युवक ठार

सोलापूर-विजापूर मार्गावरील दुर्घटना: अपघातात 2 युवक ठार

Published On: Oct 12 2018 12:55AM | Last Updated: Oct 11 2018 11:12PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी
सोलापूर-विजापूर मार्गावर अकरा मैल येथे कृष्णा मंगल कार्यालयाच्या समोर कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसने समोरून येणार्‍या दुचाकीस्वाराला उडवल्याने मंगळवेढा तालुक्यातील दोन युवक जागीच ठार झाले. प्रवीण भीमाशंकर तोरणे (वय 20, रा. अरळी) व आकाश राजशेखर सोमगुंडे (वय, 20, रा. अरळी) अशी त्या मृत पावलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. हा अपघात गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या  सुमारास झाला.  घटना घडताच रुग्णवाहिका बोलवण्यात आली; मात्र त्या युवकांनी  जागेवरच आपले प्राण सोडले होते. ते उमरगा येथे वरिष्ठ महाविद्यालयात शिकत होते. ते उमरगा येथून अरळी या आपल्या मूळ गावी येत असताना हा अपघात विजापूर- सोलापूर रस्त्यावरील अकरा मैल या ठिकाणी झाला. कृष्णा मंगल कार्यालयाच्या समोर हा अपघात झाला.

कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसने धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मुद्देबिहाळ -सोलापूर-लातूर या मार्गे असणार्‍या बसने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात  समोरून येणार्‍या या दुचाकीस्वारांना धडक दिली. मंद्रूप येथील पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती देण्यात आली आहे. गुंजोटी (तालुका उमरगा)  येथे शिकत असणार्‍या या युवकांच्या गुरुवारी प्रात्यक्षिक परीक्षा असल्याने ते कॉलेजला गेले होते वरुन परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला या घटनेनंतर आरळी गावात शोककळा पसरली आहे.