Sat, Aug 24, 2019 10:56होमपेज › Satara › कराड : ऐन दिवाळीत दरोडा; १६ तोळे सोन्यावर डल्ला

ऐन दिवाळीत दरोडा; १६ तोळे सोन्यावर डल्ला

Published On: Nov 08 2018 4:47PM | Last Updated: Nov 08 2018 4:47PMउंडाळे : प्रतिनिधी 

ऐन दिपावलीच्या धामधुमीत लक्ष्मी पूजनादिवशी टाळगाव व साळशिरंबे (ता. कराड, जि. सातारा) येथे चोरट्यांनी लोकांना मारहाण करत धुमाकुळ घातला. वृद्धेला बांधून तिच्या अंगावरील तसेच सारशिरंबेतील काकासाहेब पाटील यांच्या घरात लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले सोन्या चांदीच्या १६ तोळे दागिनेवर डल्ला मारत दरोडा घातला. चोरटयाचे मारहाणीत सेवानिवृत शिक्षक जखमी झाले असून चोरट्यानी सुमारे २५ ते ३० लाख रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. 

या बाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी की, लक्ष्मी पूजन संपवून लोक झोपी गेलेचा फायदा घेत राञी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी टाळगाव येथील महेश मोहन जाधव यांच्यात बंगल्यातील बाहेरील लोंखडी सेप्टी दरवाजाची कडी तोडली. याच आवाजाने घरातील लोक जागे झाले व त्यांनी आरडा - ओरडा केला, तेव्हा चोरटे पळून गेले. त्यानंतर ते गावात शिरले. याच दरम्यान लघूशंकेसाठी उठलेले आनंद सपकाळ यांना कोणीतरी दिसले, तेव्हा त्यांनी त्यांना हटकले. त्यावेळी चोरट्यानी त्यांना हातातील लोखंड फेकून मारले, यात ते जखमी झाले.

पुढे या चोरट्यानी कलावती शामराव सकपाळ यांच्या घरात मागील दरवाजा तोडून  प्रवेश केला व या वृद्धेला अंथरूणालाच बांधून तिच्या गळ्यातील पाच ते सहा तोळ्याचे दागिने व लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले दागिने पैसे घेऊन साळशिरंबेच्या रस्त्याने पलायन केले. चोरीची माहिती कराड तालुका पोलीसांना समजताच ते घटनास्थळी पोहचले व त्यांनी आढावा घेतला. ऐन दिपावली सणादिवशी चोरट्यानी विभागात दरोडा घातल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.