Mon, Jun 17, 2019 10:53होमपेज › Satara › अल्पवयीन मुलीचा बालविवाह ; २७ जणांवर गुन्हा

अल्पवयीन मुलीचा बालविवाह ; २७ जणांवर गुन्हा

Published On: Oct 12 2018 2:40PM | Last Updated: Oct 12 2018 2:38PMकुडाळ : प्रतिनिधी

मेढा, ता. जावली येथे गत वर्षी नोव्हेंबरमध्ये एक विवाह झाला होता. त्यावेळी मुलीचे वय हे १७ वर्षाच्या आत होते.  या बाबतची माहिती सर्वांना असूनही तिच्या इच्छेविरूध्द लग्न लावून देण्यात आले होते. याप्रकरणी शुक्रवारी मेढा पोलिस ठाण्यात २२जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जावलीत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील वर्‍हाडी मंडळींवरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितल्यामुळे आणखी काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, मेढ्यातील एका मंगल कार्यालयात २३  नोव्‍हेंबरला लग्न झाले होते. यातील विवाहित मुलीचे वय १७ वर्षांपेक्षा कमी होते. याची सर्व माहिती वर आणि वधू पक्षाच्या लोकांना माहित होती. तरीही त्या मुलीच्या इच्छेविरूध्द लग्न लावून देण्यात आले होते. या घटनेला आता कुठे वाचा फुटली. याप्रकरणी लता जंगम, सागर जंगम, महादेव जंगम, मनोज जंगम, मयूर जंगम, संदीप जंगम, सागर जंगम सर्व रा. मोळेश्वर,  उषा जंगम, वनिता जंगम, माधवी जंगम, सुषमा जगदाळे, शांता हिरेमठ रा. कोरेगाव, भाग्यश्री जंगम, दिपाली जंगम, नितीन सरताळे, मंगल जगदाळे, शशिकांत जंगम, सुजाता जंगम, मंगल जंगम, वीरप्पा जंगम, कांताबाई जंगम, संतोष जंगम, विद्या जंगम रा. महाबळेश्वर यांच्यासह २७ जणांवर बालविवाह कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बालविवाह लावल्यप्रकरणी एवढ्या जणांवर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याचबरोबर  लग्नामध्ये  वर आणि वधू पक्षाकडून जे लग्नात पाहुणे मंडळी म्हणून आले होते.  त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सपोनि जीवन माने यांनी दिली. त्यामुळे संशयित आरोपींच्या संख्येत वाढ होणार आहे. यामध्ये काही जणांना अटक करण्यात आली आहे.