होमपेज › Satara › खंडाळा : पं.स. बैठकीत सदस्य-सभापतींमध्ये जोरदार खडाजंगी (व्हिडिओ)

खंडाळा : पं.स. बैठकीत सदस्य-सभापतींमध्ये जोरदार खडाजंगी (व्हिडिओ)

Published On: Dec 08 2017 2:25PM | Last Updated: Dec 08 2017 2:25PM

बुकमार्क करा

लोणंद  प्रतिनिधी  

खंडाळा पंचायत समितीचे सभापती यांच्या दालनाशेजारील अॅन्टी चेंबरला कुलुप लावल्याच्या कारणावरून विरोधी सदस्य चंद्रकांत यादव  आणि सभापती मकरंद मोटे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी झालेल्या हमरीतुमरीमुळे सभागृहातील वातावरण गरमागरम झाले होते.

सभा सुरू होताच विरोधी सदस्य चंद्रकांत यादव यांनी सभापतींच्या अॅन्टी चेंबरला टाळे का लावण्यात आला ही हुकुमशाही चालली असल्याचा आरोप करीत निषेध केला व टाळे काढला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा ईशारा त्यांनी दिला. गटविकास अधिकारी दीपा बापट यांनी राजकारण करु नये, याबाबत खुलासा करावा असे म्हणाले. त्यावर सभापती मकरंद मोटे यांनी अॅन्टी चेंबर हे सभापतीचे असते. पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना सभापती दालन बसण्यासाठी व नागरीक, शेतकरी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खुले आहे त्यांनी त्या ठिकाणी बसावे. त्या ठिकाणी बसायला लाज वाटते काय असा सवालही त्यांनी केला. 

यावेळी उपसभापती वंदना धायगुडे -पाटील, सदस्य राजेंद्र तांबे , अशविनी पवार यांनी मकरंद मोटे यांचे तर शोभा जाधव यांनी चंद्रकांत यादव यांच्या भुमिकेचे समर्थन केले.आजच्या मासीक बैठकित विविध विकास कामावर चर्चा झाली. बैठकिला हजर नसणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.