Mon, Dec 17, 2018 04:14



होमपेज › Satara › कराड बस स्टँडवर पिस्तुलासह युवकाला अटक

कराड बस स्टँडवर पिस्तुलासह युवकाला अटक

Published On: Oct 11 2018 8:09AM | Last Updated: Oct 11 2018 8:09AM



सातारा : प्रतिनिधी

कराड बसस्थानक परिसरातून सागर सदाशिव नलावडे (वय २०, रा. देशमुखमळा, पार्ले ता. कराड) या युवकाकडून स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने पिस्तुल जप्त केले. बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी, कराड परिसरात एक युवक बेकायदा पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. कराड स्टँड परिसरात पोलिस गस्त घालत असताना एक युवक संशयितरीत्या फिरत होता. एलसीबीच्या पथकाने त्याला हटकताच तो पळून जाऊ लागला. एलसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्याच्याकडे पिस्टल सापडले.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी त्याला नाव विचारल्यावर त्याने सागर नलावडे असे नाव सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व पिस्टल जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताला कराड पोलिस ठाण्यात नेऊन त्याच्याविरुद्ध आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. या कारवाईनंतर संशयित युवकाकडे पोलिस रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी करत होते.