Sat, Jan 18, 2020 03:33होमपेज › Satara › सातारा : शिकाऱ्याकडून १३ घोरपडी जप्त (video)

सातारा : शिकाऱ्याकडून १३ घोरपडी जप्त (video)

Last Updated: Dec 07 2019 10:01AM
सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील मौजे वाठार (ता. कोरेगाव) च्या हददीत घोरपडीची शिकार करणाऱ्याचा वन विभागाने पर्दाफाश केला. संशयिताने कुत्र्याच्या मदतीने घोरपडींची शिकार केली आहे. त्याच्याकडून तब्बल १३ घोरपडी जप्त करण्यात आल्या आहेत.

संशयित आरोपी श्रीरंग श्रीपती चव्हाण (वय ६०) याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याकडील शिकारी कुत्रा, मोटरसायकल व इतर मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? या टोळीत आणखी कोण आहे? घोरपडी कोणाला विकल्या जाणार होत्या? आतापर्यंत अशा किती शिकारी केल्या आहेत? याचा तपास केला जात आहे.