Mon, Dec 17, 2018 03:47होमपेज › Satara › देवीच्या काकड आरतीसाठी गर्दी(व्हिडिओ)

देवीच्या काकड आरतीसाठी गर्दी(व्हिडिओ)

Published On: Oct 12 2018 10:53AM | Last Updated: Oct 12 2018 10:53AMसातारा : प्रतिनिधी

सध्या सर्वत्र अंबा मातेचा जागर सुरू झाला आहे. त्यामुळे रात्री जागू लागल्या आहेत. साताऱ्यातील मानाच्या देवींना भक्त नवस बोलत आहेत. तर दर्शनासाठी आता गर्दी वाढू लागली आहे. शहरातील मोती चौक येथील श्रीमंत प्रतापसिंह नवरात्रोत्सव मंडळाची देवी मानाची आहे. दररोज या देवीची पहाटे काकड आरती होते. या आरतीसाठी शहरातील विविध भागातून शेकडो नागरिक भल्या पहाटे येतात. त्यामुळे आरतीसाठी मोती चौक गर्दीने फुलून जातो. 

शुक्रवारी तिसऱ्या माळेला आरतीसाठी गर्दी झाली होती. दसरा होईपर्यंत असाच माहोल राहणार आहे.