Mon, Sep 16, 2019 05:30होमपेज › Satara › खटाव : बुधावलेवाडीत गोळीबार, युवक जखमी 

खटाव : बुधावलेवाडीत गोळीबार, युवक जखमी 

Published On: Dec 18 2018 6:17PM | Last Updated: Dec 18 2018 8:00PM
खटाव : प्रतिनिधी 

बुधावले (ता. खटाव) येथील सुरेश नारायण बुधावले याने गावातीलच सुजीत सदाशिव बुधावले ( वय, १९ ) याच्यावर रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. यात सुजीत गंभरी जखमी झाला. सिजीतला पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेबाबत पुसेगाव पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, बुधावलेवाडीतील सुरेश बुधावले याने २२ जानेवारी रोजी सुजीत बुधावले याला फोनवरून शिव्या दिल्या होत्या. सध्या पनवेल येथे वास्तव्यास असणारा सुजीत १४ डिसेंबर रोजी लग्नानिमित्त बुधावलेवाडीत आला होता. सोमवारी रात्री साडेदहा वाजता फोनवरुन शिव्या का दिल्या? असा जाब विचारायला सुजीत बुधावले सुरेश बुधावलेच्या घरी गेला. त्यावेळी घराच्या पाठीमागच्या दाराने येवून सुरेश याने रिव्हॉवरमधून सुजीतवर गोळी झाडली. ही गोळी सुजीतच्या पोटात लागली. 

घटनेनंतर सुजीतच्या आई आणि इतर नातलगांनी त्याला रात्रीच पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या घटनेचा तपास करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी मंगळवारी दुपारी बुधावलेवाडी येथून गोळीबार करणाऱ्या सुरेश बुधावले याला अटक केली.