Sat, Aug 17, 2019 20:07होमपेज › Satara › कोयना धरणाजवळ ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप

कोयना धरणाजवळ ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप

Published On: Mar 06 2018 11:06AM | Last Updated: Mar 06 2018 11:06AMपाटण : प्रतिनिधी 

कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री 1.43 मिनिटांनी 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 13.6 किलोमीटर अंतरावर गोषटवाडी गावाच्या नैऋतेस 9 कि. मि. अंतरावर होता. भूकंपाची खोली 7 कि. मि. अंतरावर होती. 

हा भूकंप कोयना, अलोरे, चिपळूण, पाटण आदी विभागात जाणवला. या भूकंपाचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झाला नसल्याचे धरण व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले. तर यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले आहे. रात्री झोपेच्या वेळी हा भूकंप जाणवल्याने गाढ झोपेत असणारे अनेक जण भितीपोटी घराबाहेर पळत सुटले.