Wed, Jun 03, 2020 19:10होमपेज › Satara › इन्व्हर्टरच्या स्फोटात दोघे गंभीर जखमी

इन्व्हर्टरच्या स्फोटात दोघे गंभीर जखमी

Published On: Jul 12 2019 8:17AM | Last Updated: Jul 12 2019 8:08AM
सातारा : प्रतिनिधी

येथील मरीआई कॉम्प्लेक्समधील 'श्री स्टेशनर्स' दुकानात इन्व्हर्टरचा भीषण स्फोट झाला. यामुळे दुकानास आग लागली व त्यात दुकानातील दोन युवक भाजून गंभीर जखमी झाले. काल, गुरुवारी (दि.११) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

मरीआई कॉम्प्लेक्समधील 'श्री स्टेशनर्स' दुकानात इन्व्हर्टरचा भीषण स्फोट होवून दुकानाला आग लागली. या आगीत दुकानातील दोन युवक गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी या आगीची माहिती मिळताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तर जखमी दोन्ही युवकांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. यानंतर या घटनेची माहिती सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी धाव घेत आग त्यांनी आग आटोक्यात आणली.