Tue, Jan 22, 2019 08:28होमपेज › Satara › दिवाळीत महाबळेश्वर मध्ये वाहतूक कोंडी

दिवाळीत महाबळेश्वर मध्ये वाहतूक कोंडी

Published On: Nov 08 2018 8:34PM | Last Updated: Nov 08 2018 8:45PMकुडाळ : प्रतिनिधी 

सलग दिवाळीच्या सुट्ट्यामुळे महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पहिल्या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहतूक यंत्रणा कोलमडून गेली आहे.  

प्रतापगड ते महाबळेश्वर पाचगणी रोड वर  ८ ते १० किमी दुतर्फा वाहतूक कोंडीने रस्ते जाम झाले होते. त्यामुळे सुट्टीची मजा लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले. हातावर मोजण्या इतपत पोलिस हजारो पर्यटकांवर नियंत्रण ठेवत होते.

दरवर्षी दिवाळीच्या ऐन हंगामात वाहतुक कोंडी नित्याची बाब झाली आहे. या हंगामात पुन्हा वाहतूक कोंडीचा प्रत्यय आला. दिवाळी सुट्टी हंगामापूर्वी अनेक बैठका होतात. मात्र त्याची अमंलबजावणी कोठेही होताना दिसत नसल्याने पर्यटकांना त्रास सहन करावा लागला.