Mon, Sep 16, 2019 11:53होमपेज › Satara › युवकास मारहाण; ११ जणांवर गुन्हा 

युवकास मारहाण; ११ जणांवर गुन्हा 

Published On: Jun 30 2018 1:20AM | Last Updated: Jun 29 2018 10:51PMपिंपोडे बुद्रुक : वार्ताहर 

तडवळे सं. वाघोली (ता. कोरेगाव) येथील भूषण संभाजी भोईटे (वय 26) या युवकाला   जमावाने लोखंडी रॉड, लाकडी दांडके व दगडाने मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या मारहाणीत भूषण भोईटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्याजवळील 80 हजार रुपयांची रक्‍कम लांबवण्यात आली आहे.  याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप  वाघ (रा. कळंबे, ता. वाई), मयूर जाधव (रा. कुडाळ, ता. जावली, रोहित मोरे (रा. गोपाळपंताचीवाडी, ता. जावली) व मंगेश शिर्के यांच्यासह अन्य सात अनोळखींविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तडवळे गावच्या हद्दीत असणार्‍या साई ढाब्याच्या पाठीमागील बाजूला शेतात 10 ते 15 जणांनी भूषण संभाजी भोईटे यांना एकट्याला गाठून मारहाण केली. या मारहाणीत भोईटे हे बेशुद्ध अवस्थेत पडले होते. या घटनेची माहिती तडवळे गावचे पोलीस पाटील बापू ठोंबरे यांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पाटील यांनी सागर शामराव भोईटे यांच्या मदतीने भूषणला वाठार स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार करुन भूषणला पुढील उपचारासाठी फलटण येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. 

वाळुच्या पैशाच्या देवाणघेवाणीवरून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.  या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास स.पो.नि खेडकर करत आहेत.