Sun, Apr 21, 2019 06:01होमपेज › Satara › फराळ स्पर्धेला कस्तुरींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फराळ स्पर्धेला कस्तुरींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Nov 05 2018 1:26AM | Last Updated: Nov 04 2018 8:03PMसातारा : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने आयोजित खमंग चकली, करंजी आणि हटके लाडू स्पर्धेला कस्तुरींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दिवाळी फराळाचा खमंग स्वाद उपस्थितांच्या जिभेवर रेंगाळला. स्पर्धेतील विजेत्या महिलांवर बक्षिसांचा अक्षरश: वर्षाव झाला. ‘हास्यकल्लोळ’च्या हसवा फसवीने उपस्थित महिलांनी  मनोरंजनाचा मनमुराद आनंदही लुटला. दरम्यान, या कार्यक्रमाचे सहप्रायोजक सातारा येथील गणेश मसालेचे कुलदीप पाटील होते. 

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने शनिवारी दिवाळी फराळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होतेे. स्पर्धेचे उद्घाटन गणेश मसालेचे कुलदीप पाटील  व कुमुदिनी पाटील यांच्या हस्ते दीप-प्रज्वलनाने करण्यात आले.  यावेळी जयश्री पाटील, उषा जाधव, नगरसेविका प्राची शहाणे,  स्वाती शेडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिवाळी खमंग फराळातील पाककृती करण्यात महिला आपले कौशल्य पणाला लावतात. त्यांच्या या पाककौशल्यासाठी फराळ स्पर्धांच्या माध्यमातून कस्तुरी क्लबकडून कौतुकाची थाप पडल्याने कस्तुरींचा आनंद व्दिगुणीत झाला. फराळ स्पर्धेत   प्रथम रेखा कासट, व्दितीय श्रध्दा मगर, तृतीय लक्ष्मी परदेशी, उत्तेजनार्थ मेघा नलवडे, पुष्पलता शिंदे यांनी बक्षीसे पटकावली. विजेत्या महिलांना गणेश मसाले यांच्याकडून आकर्षक बक्षीसे देण्यात आली.

फराळ स्पर्धेचे परीक्षण सौ. वर्षा पाटील यांनी केले.  दरम्यान, उपस्थित सभासद महिलांसाठी ‘हास्यकल्लोळ’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही यावेळी आयोजन केले होते.

सभासद नोंदणी अंतिम टप्प्यात

दै. ‘पुढारी’ क्‍लबची नवीन सभासद नोंदणी आता अंतिम टप्प्यात आहे.त्यासाठी  550 रु. सभासद नोंदणी फी भरुन लगेचच 550 रुपयांचा प्रेशर कुकर आणि ‘सुवर्ण स्पर्श’कडून गोल्ड प्लेटेड नथ हमखास गिफ्ट म्हणून याशिवाय बरेचसे फ्री कुपन, डिस्काऊंट कुपन आणि लकी ड्रॉ कुपन्स मिळणार आहेत. तरी इच्छुकांनी त्वरित आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन दै.‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8805007192 येथे संपर्क साधावा.