Mon, Sep 16, 2019 05:30होमपेज › Satara › सातारा : वाजराई धबधब्या जवळील डोंगरावरून पडून युवकाचा मृत्यू 

सातारा : वाजराई धबधब्या जवळील डोंगरावरून पडून युवकाचा मृत्यू 

Published On: Mar 15 2019 4:04PM | Last Updated: Mar 15 2019 4:04PM
सातारा : प्रतिनिधी

वाजराई धबधब्याच्या जवळील डोंगरावरून पाय घसरून पडून साताऱ्यातील युवकाचा जागीच मृत्यू झाला. बिरेंद्र ढकाळ असे युवकाचे नाव आहे.

साताऱ्यातील सदरबझार परिसरात राहणारा बिरेंद्र ढकाळ हा तरुण आपल्या मित्रांसोबत फिरायला गेला होता. याचवेळी डोंगरावरून पाय घसरून तो खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या मित्र परिवाराने तसेच नातेवाईकानी सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्याच्या परिवारातील लोकांनी त्याचा मृत्यू हा संशयास्पद असून त्या बाबत योग्य ती कारवाई झाल्या शिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

दरम्यान याबाबत मृत मुलाच्या पालकांनी  मुलाचा घातपात केला असल्याचा आरोप केल्याने पोलिसांशी तपासा त्याच्या बरोबर असणाऱ्या मित्रांना चौकशी कामी ताब्यात घेतले असून योग्य ती चौकशी सुरू असल्याचे सांगितले.