Mon, Dec 09, 2019 19:06होमपेज › Satara › कराड रेल्वे स्थानकावर रेल्वे पटरी सोडून भरकटली(व्हिडिओ)

कराड : पटरी सोडून रेल्वे भरकटली(व्हिडिओ)

Published On: Jun 18 2019 1:05PM | Last Updated: Jun 18 2019 1:16PM
कराड (ओगलेवाडी) : पुढारी ऑनलाईन

कराड रेल्वे स्थानकावर  रेल्वे चालकाच्या अनावधानाने मालवाहतूक रेल्वे  पटरी सोडून चुकीच्या पटरीवर गेल्याने भरकटल्याची घटना घडली. या झालेल्या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, इंजिन चालकाच्या अनावधानाने रेल्वे पटरी सोडून चुकीच्या पटरीवरून धावू लागली. मात्र ही पटरी नादुरुस्त आहे. शिवाय त्या पटरीवर मातीचे ठीग टाकण्यात आले आहेत. या पटरीवर रेल्वे काही अंतरावर जाऊन मातीच्या ढिगार्‍यावर जाऊन थांबली. त्यामुळे या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. अशी माहिती रेल्वे व्यवस्थापकांनी दिली.