Mon, Sep 16, 2019 05:32होमपेज › Satara › युवतीच्या आत्महत्येप्रकरणी युवकासह तिघांवर गुन्हा दाखल

युवतीच्या आत्महत्येप्रकरणी युवकासह तिघांवर गुन्हा दाखल

Published On: Oct 03 2018 7:12PM | Last Updated: Oct 03 2018 7:12PMसातारा : प्रतिनिधी

प्रेमाचे व लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका युवकासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. इंदिरानगर येथील चैत्राली कांबळे (वय १८) या युवतीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली होती. याप्रकरणी आज, बुधवार (दि.३ ऑक्टोबर) सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विकी पवार, विकीची चुलत बहिण व विकीचे वडील (सर्व रा.अमरलक्ष्मी, कोडोली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मृत चैत्राली हिची आई सुहासिनी अजित कांबळे (वय 62, रा.इंदिरानगर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चैत्राली हिने (दि. 20 सष्टेंबर रोजी) राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली होती. या घटनेने तिचे कुटुंबिय हादरुन गेले. चैत्रालीचे विकी नावाच्या युवकाशी जून २०१७ पासून प्रेमसंबंध होते. चैत्राली हिच्याकडून विकीच्या चुलत बहिणीने व वडीलांनी लग्नाचे आमिष दाखवून सोन्याचे मंगळसूत्र व ३० हजार रुपये घेतले होते. मात्र नंतर संशयितांनी चैत्रालीची फसवणूक केली. या घटनेने चैत्राली खचली होती व त्यातच तिने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित युवकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिस अधिक तपास करीत आहेत.