होमपेज › Satara › सुशांत मोरे यांचे उपोषण सुरू

सुशांत मोरे यांचे उपोषण सुरू

Published On: Nov 15 2017 1:55AM | Last Updated: Nov 15 2017 12:44AM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

‘पोक्सो’प्रकरणी पोलिसांनी महसूल अधिकारी अजित पवार व बिल्डर संदीप चव्हाण यांच्याविरुद्ध कारवाई न केल्याने सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या भूमिकेवरही त्यांनी संशय व्यक्‍त केला असून, आर्थिक तडजोडीतून संशयितांना अभय दिले जात असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे.

सुशांत मोरे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, सातारा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दि. 31 ऑक्टोबर रोजी याबाबतचे निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा शहर पोलिस ठाण्यात पोक्सोप्रकरणी आनंद पवार या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्याला सहकार्य केल्याप्रकरणी पुणे विभागीय कार्यालयातील रोजगार हमी योजनेचे उपायुक्‍त अजित पवार व सातार्‍यातील बिल्डर संदीप चव्हाण यांचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले. पोलिस तपासात दोन्ही नावे समोर आल्यानंतर त्यांच्यावर  अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. राजकीय दबाव व आर्थिक तडजोडीमुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर हे याप्रकरणी कचखाऊ धोरण अवलंबत आहेत.