होमपेज › Satara › खंडणीप्रकरणी संजय गाडे, गायकवाड यांना अटक

खंडणीप्रकरणी संजय गाडे, गायकवाड यांना अटक

Published On: Nov 15 2017 1:55AM | Last Updated: Nov 15 2017 12:38AM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

पक्षाचे कॅलेंडर छापण्यासाठी हॉटेल व्यावसायिकाकडून 15 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी रिपाइंचा श्रमिक ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष संजय गाडे व सिद्धार्थ नारायण गायकवाड (वय 37,  रा. दुंद, ता. जावली) या दोघांना पोलिसांनी मेढा येथे अटक केली आहे. 

भणंग (ता. जावली) येथे राजेंद्र परशुराम लावंघरे यांच्या मालकीचे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये येऊन पक्षाचे कॅलेंडर छापण्यासाठी 5 व स्वत:साठी 10 अशी 15 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी लावंघरे यांनी गाडे याच्यावर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गाडे पसार होता. मंगळवारी दुपारी पोलिसांनी मेढा येथून गाडे व त्याचा साथीदार सिद्धार्थ गायकवाड या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 5 हजार रुपये हस्तगत करण्यात आलेे. या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता  3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.