Mon, Jul 06, 2020 17:51होमपेज › Satara › सातारा : अनधिकृत बांधकाम प्रकरणी नगराध्यक्षा अपात्र

सातारा : अनधिकृत बांधकाम प्रकरणी नगराध्यक्षा अपात्र

Published On: Oct 26 2018 1:53PM | Last Updated: Oct 26 2018 1:52PMलोणंद : प्रतिनिधी

लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या दरम्यान विदयमान नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके - पाटील यांना अनाधिकृत बांधकामाच्या कारणांवरून अपात्र करण्याचा निकाल जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. त्यामुळे लोणंदच्या राजकीय वर्तुळात भुकंप झाला आहे.

विद्यमान नगराध्यक्षांना अपात्रतेचा झटका बसल्याने लोणंदच्या राजकारणाची समीकरणेच बदलून गेली. लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्नेहलता शेळके - पाटील आणि त्याची मुले  संग्राम शेळके - पाटील, हर्षवर्धन शेळके - पाटील यांनी अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी भाजपाचे उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके यांनी  जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्या अनाधिकृत बांधकामाची सुनावणी गेल्या काही महिन्यापासून सुरु होती.  परंतु, जिल्हाधिकारी यांनी निकाल राखून ठेवला होता. गेल्या काही दिवसांपासून कधीही निकाल लागू शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. 

त्यानुसार  नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या दिवशीच शेळके - पाटील यांना अपात्र करण्याचा निर्णय दिला गेल्याने राजकीय वर्तुळात भुकंप झाल्याचे चित्र निर्माण झाले.