Wed, Jan 16, 2019 22:08होमपेज › Satara › कस्तुरी क्‍लबतर्फे राखी मेकिंग-गणपती सजावट वर्कशॉप

कस्तुरी क्‍लबतर्फे राखी मेकिंग-गणपती सजावट वर्कशॉप

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 11 2018 1:22AMसातारा: प्रतिनिधी

श्रावण महिना सुरु झाला की, सुरु होतात वेग वेगळे आनंद देणारे सण. यातीलच पहिला सण म्हणजे बहीण भावाचं नातं घट्ट करणारा रक्षाबंधन.  याचेच औचित्य साधून दै.‘पुढारी’ कस्तुरी कल्बतर्फे राखी मेकिंग आणि गणपती सजावट साहित्य या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्कशॉप भुईंज येथील मारुती मंदिर येथे रविवार दि. 12 रोजी दुपारी 12 ते 2  यावेळेत  व सातारा येथील केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशन केसरकर पेठ येथे सायंकाळी 4 ते 6 यावेळेत होणार आहे. 

हे वर्कशॉप सर्वांसाठी विनामूल्य असून या वर्कशॉपमध्ये राधिका पाटील व वर्षा इदाते या राखी कशी तयार करावी? याचे प्रात्यक्षिक दाखवून व्यवसाय उभारणीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबर गणेश सजावट साहित्य, फोल्डींग पणती, आकाश दिवे, इन्स्टट रांगोळी, हळदी-कुंकू करंड डेकोरेशन आदी  प्रात्यक्षिके या वर्कशॉपमध्ये होणार आहेत. उपस्थित महिलांमधून तीन लकी ड्रॉ राधिका पाटील यांच्यावतीने काढण्यात येणार आहेत. वर्कशॉपच्या अधिक माहितीसाठी भुईंज कमिटी मेंबर विद्या किरवे 9527933561 व सातारा तेजस्विनी बोराटे 8805007192 यांच्याशी संपर्क साधावा.