Wed, Jul 24, 2019 14:25होमपेज › Satara › पंढरीची वारी यावेळी स्वच्छ व निर्मळ : अतुल भोसले (video)

पंढरीची वारी यावेळी स्वच्छ व निर्मळ : अतुल भोसले (video)

Published On: Jul 12 2019 4:29PM | Last Updated: Jul 12 2019 4:16PM
पंढरपूर : सतीश मोरे 

विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती ट्रस्टने राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे पंढरीची वारी यावेळी स्वच्छ व निर्मळ झाली आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी समिती ट्रस्ट सदैव कार्यरत असून संत विद्यापीठासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डी देवस्थान यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समिती ट्रस्टने उत्पन्नात गेल्या तीन वर्षांत दुपटीने वाढ केली असून खर्चात कपात आणि योग्य नियोजनामुळे हे झाले असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितले.

देवाच्या दारात जाऊन काही मागावे लागत नाही. आपल्या मनात काय असतं हे देवाला माहीतच असतं तरीही विठ्ठलाला महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुजलाम-सुफलाम ठेव. दुष्काळातून होरपळलेल्या जनतेला त्यातून मुक्त कर असे आळवणी देवाकडे केली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले.

पंढरपूर येथे शासकीय पूजा संपल्यानंतर मंदिराच्या सभामंडपात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरीच्या वारीतील प्रथम क्रमांक मिळविलेल्या कराडकर बारा नंबर दिंडी चालकांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच वारी यशस्वीपणे पार पडण्यासाठी झटलेल्या शासकीय अधिकाऱ्यांचा व मंदिर समिती ट्रस्ट सदस्यांचा सत्कार करण्यात आला.