Sun, Apr 21, 2019 05:41होमपेज › Satara › दिलखेचक अदाकारी अन् कस्तुरींचा जल्‍लोष

दिलखेचक अदाकारी अन् कस्तुरींचा जल्‍लोष

Published On: Nov 02 2018 1:13AM | Last Updated: Nov 01 2018 8:43PMकराड : प्रतिनिधी 

टाळ्यांचा कडकडाट, ओसंडून वाहणारा उत्साह, शिट्ट्यांची बरसात आणि नृत्यांगणांच्या प्रत्येक  लावणीला महिलांच्या मिळणार्‍या उत्स्फुर्त प्रतिसादात दै. पुढारी कस्तुरी  क्लबच्या सदस्यांनी लावण्यांच्या अस्सल दुरंगी कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावत नृत्यांचा मनमुराद आनंद लुटला. तालासुरावर थिरकणार्‍या महिला व नृत्यांगणांसह टाऊन हॉल दणाणून गेला. 

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या सभासदांसाठी सिनेतारका लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत व बालगंधर्व पुरस्कार विजेती युवा लावणीसम्राज्ञी पुनम कुडाळकर यांचा अस्सल दुरंगी सामना व ठसकेबाज लावण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत, पुनम कुडाळकर, स्पिरीट इन्स्टिट्यूटचे संस्थापक विजय देशमुख, सेंटर को— ऑर्डिनेटर शितल शेवाळे, ईटूई एज्युकेशनचे मिलिंद गायकवाड यांचा सत्कार दै.‘पुढारी’चे  ब्युरो मॅनेजर सतीश मोरे यांनी केला.  

कार्यक्रमाचे प्रायोजक स्पिरिट इन्स्टिट्यूट होते. गेली दहा वर्षापासून स्पिरिट इन्स्टिट्यूटने शिक्षण क्षेत्रात इंग्रजी भाषेचे ज्ञान देण्याचे काम करत आहे. आतापर्यंत स्पिरिटने सुमारे 50,000 विद्यार्थ्यांना यशस्वी ट्रेनिंग देवून,  विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास, व्यक्‍तिमत्व विकास अभ्यासाचे तंत्रज्ञान तसेच  लोकांशी संवाद कसा करावयाचा या सर्व गोष्टींचा बौध्दिक विकास करण्याचे काम ‘स्पिरिट’करत आहे.  प. महाराष्ट्रात इंग्रजी प्रसारणामध्ये एकमेव प्रगतशिल संस्था म्हणून ओळखली जाते. 

‘लावणी’ म्हणजे 

महाराष्ट्राच्या लोककलेतील महत्वाची कला. नृत्य कलेतील वैशिष्ट्यपूर्ण आणि  वेड लावणारी लावणी मात्र महिलांसाठी तशी दुर्मीळच. यामुळेच ‘कस्तुरी क्लब’च्या सभासदांसाठी  या लावणीचे आयोजन केले होते.  ‘या रावजी बसा भावजी’,‘कैरी पाडाची’,   ‘कुणीतरी न्याहो मला फिरवायला’, आदी ठसकेबाज गाण्यांवर महिलांनी नृत्यांचा फेर धरला.  

सुवर्णस्पर्शकडून महिलांना नथ भेट

प्रत्येक कस्तुरी क्लब सभासदांसाठी येथील सुवर्णस्पर्श जेम्स अ‍ॅन्ड ज्वेलरी यांच्याकडून सभासद महिलांना मोफत नथीचे कुपन देण्यात आले. सुवर्णस्पर्शमध्ये 1 ग्रॅम फार्मिंग दागिन्यांवर 50 टक्के, भाग्यरत्नावर 30 टक्के डिस्काऊंट देणार आहेत. यांच्याकडे कानातले, गळ्यातले हार, अंगठ्या, बांगड्या आदींच्या भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत. 

लकी ड्रॉ चे कूपन्स टाकण्याची मुदत नोव्हेंबर अखेर

कस्तुरी सदस्यांसाठी असणारे विविध लकी ड्रॉचे कूपन्स संबंधित दुकानांमध्ये महिलांनी दि. 30 नोव्हेंबर पर्यंत ड्रॉ बॉक्समध्ये टाकावयाचे आहेत. ज्या सदस्यांना अद्यापही कूपन्स मिळालेले नाहीत त्या महिलांनी दै.‘पुढारी’ कार्यालयातून कूपन बुक घेवून जायचे आहे.

सभासद नोंदणी अंतिम टप्प्यात...

पुढारी कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणीस थोडेच  दिवस  बाकी असून आजच आपले सभासद नोंदणी करा. सभासद नोंदणी फी 550/- रु. असून हमखास गिफ्ट म्हणून दिड लिटरचा प्रेशर कुकर, सुवर्ण स्पर्श ज्वेलर्स यांचेकडून गोल्ड प्लेटेड नथ या व्यतिरिक्‍त भरपूर डिस्काऊंट आणि फ्री कूपन्स सुद्धा मिळणार आहेत. संपर्क ः दै. पुढारी कार्यालय, फोन  नं. - 02164- 222392, 8805023653.