Fri, Jul 19, 2019 15:27होमपेज › Satara › फौजदाराकडून एसबीच्या दोन पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न

फौजदाराकडून एसबीच्या दोन पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न

Published On: Aug 10 2018 2:50PM | Last Updated: Aug 10 2018 4:09PMसातारा : प्रतिनिधी

शुक्रवारी दहिवडी पोलिस ठाण्याचा फौजदार दबडे याने १३ हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. यावेळी सापळ्यात आपण अडकणार हे लक्षात येताच फौजदार दबडे याने लाचलूचपतच्या दोन पोलिसांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला आणि पसार झाला असल्याची थरारक घटना घडली. दरम्यान, या घटनेने सातारासह महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी फौजदार दबडे याने लाच मागितली. ही तक्रार सातारा एसीबी विभागात आली. शुक्रवारी त्यानुसार एसीबीचे पथक दहिवडी येथे सापळा लावून थांबले होते. यावेळी पोलिस हवालदार अजित करणे व काटकर हे थांबले होते. ट्रॅप होणार हे दबडे याच्या लक्षात येताच त्याने कार काढली व थेट पोलिसांच्या अंगावर घालून तेथून धूम ठोकली. या सर्व घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, दोन्ही पोलिस जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.