Sat, Jul 04, 2020 21:11होमपेज › Satara › बेळगावसह १४ ठिकाणी सीबीआयकडून छापे

बेळगावसह १४ ठिकाणी सीबीआयकडून छापे

Last Updated: Nov 09 2019 2:05AM
बंगळूर : प्रतिनिधी

कोट्यवधींच्या आयएमए (आय मॉनेटरी अ‍ॅडव्हायजरी) घोटाळ्याप्रकरणी बेळगावसह बंगळूर व इतर 14 ठिकाणी सीबीआयने छापे घालून तपास केला. बंगळुरातील 11, बेळगाव, रामनगर आणि मंड्या येथे शुक्रवारी छापे घालण्यात आले. प्रमुख संशयित कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक मन्सूर अली खान याला देशाबाहेर जाण्यासाठी काही अधिकार्‍यांनी मदत केल्याचा संशय आहे. त्यावरून  सीबीआयने बेळगावसह चौदा ठिकाणी छापे टाकले. बंगळुरातील 11 ठिकाणी सुमारे तीन तास तपास सुरू होता. 

सीबीआयचे एस. पी. थॉम्सन जोस यांच्या नेतृत्वाखाली छापे घालण्यात आले. सीआयडीचे डीवायएसपी श्रीधर, एस. पी. अजय हिलोरी, राजकुमार खत्री, विजयशंकर, श्रीधर, व्ही. ए. मंजुनाथ आदी अधिकार्‍यांवर छापे घालून काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

हजारो लोकांनी आयएमएमध्ये गुंतवणूक केली आहे. हा घोटाळा उघड झाल्यानंतर कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक मन्सूर अली खान फरारी झाला होता. काही दिवसांनी त्याने व्हिडिओ व्हायरल करुन सर्व गुंतवणूकदारांचे पैसे देणार असल्याचे सांगितले. काही राजकारण्यांनी आपल्याकडून घेतलेले पैसे परत केले नसल्याचा गौप्यस्फोटही त्याने केला होता. याचा तपास केला जात आहे.