Sun, Apr 21, 2019 06:18होमपेज › Satara › बालचमुंनी साकारली किल्ले रायगडची प्रतिकृती

बालचमुंनी साकारली किल्ले रायगडची प्रतिकृती

Published On: Nov 09 2018 1:18PM | Last Updated: Nov 09 2018 1:58PMकुडाळ : पुढारी ऑनलाईन 

दिवाळीच्या सुट्टीमध्ये कुडाळ तालुक्यातील जावळी येथे प्रत्येक गल्लोगल्लीत ऐतिहासिक किल्ले उभारून बालचमूंनी शिवप्रभूंचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यालाच कौतुकाची थाप गजराज मित्र मंडळ कुडाळ यासह कुडाळमधील शिवप्रेमींनी दिली आहे.

गजराज मित्र मंडळ कुडाळ व शिवप्रेमी युवक यांच्या माध्यमातून दरवर्षी कुडाळ येथे भव्य किल्ल्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात  याही वर्षी गजराज मित्र मंडळ कुडाळ यांच्यातर्फे व शिवप्रेमी यांच्या माध्यमातून बक्षिसे व मुलांच्या उपक्रमांना भरघोस बक्षिसांची खैरात देण्यात आली.

नवज्योत  तरुण मंडळ कुडाळ येथील बाल कलाकारांनी रायगडची प्रतिकृती उभारून साक्षात हुबेहूब रायगड उभारला असल्याने कुडाळ परिसरातील लहान मुले यांच्यासह युवक या रायगडच्या प्रतिकृतीला पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत हुबेहूब रायगड सारखेच प्रतिकृती लहान मुलांनी उभारले असल्याने दिवाळीच्या सुट्टी लागल्यानंतर लगातार आठ दिवस किल्ले रायगड ची प्रतिकृती उभारणीसाठी या मुलांनी कष्ट घेतले.