Sat, Aug 24, 2019 11:05होमपेज › Satara › फोन, व्हॉट्स अपसारखा वापरते म्हणून छळ

फोन, व्हॉट्स अपसारखा वापरते म्हणून छळ

Published On: Jan 11 2019 1:20AM | Last Updated: Jan 11 2019 12:20AM
सातारा : प्रतिनिधी

फोनवर जास्त बोलत असल्याच्या कारणावरुन पती व सासर्‍याकडून छळ होत असल्याची तक्रार नागठाणे (ता.सातारा) येथील स्वप्नाली निखिल साळुंखे (वय 20) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार फोनवर जास्त बोलते. व्हॉटसअपवर चॅट करते. तसेच वाढदिवसाचे फोटो व्हॉटसपवर स्टेटस म्हणून ठेवते. या कारणावरुन पती निखील साळुंखे याने पत्नीला मारहाण केली. पतीबरोबरच सासरे नंदकुमार साळुंखे त्रास देत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यानुसार त्या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी अधिक तपास करत आहेत.