Mon, Jul 06, 2020 04:47होमपेज › Satara › सातारा : सोनगावच्‍या उपसरपंचास दारू विक्रीप्रकरणी अटक

सातारा : सोनगावच्‍या उपसरपंचास दारू विक्रीप्रकरणी अटक

Published On: Feb 05 2019 4:26PM | Last Updated: Feb 05 2019 4:26PM
कुडाळ : प्रतिनिधी

जावली तालुक्यातील सोनगाव येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच अरविंद सीताराम शिंदे यांना अवैध दारू विक्री करत असताना मेढा पोलिसांनी रंगेहात पकडले.  त्यांच्याकडील बत्तीस हजार रुपयाची दारू पोलिसांनी हस्तगत केली आहे. 

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज ( दि. ५) रोजी सकाळी नऊच्या सुमारास सोनगावचे उपसरपंच अरविंद सीताराम शिंदे हे देशी दारूच्या बाटल्या व इतर असा एकूण ३२हजार रुपयांचा मुद्देमाल बाळगून स्वतःच्या मोटरसायकलवरून  दारूची वाहतूक करत होते. ही बाब पोलिसांच्‍या निदर्शनास आली. त्यांची झडती घेतल्यानंतर देशी-विदेशी दारूच्या बाटल्या त्यांच्याकडे सापडल्‍या. 

यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा अवैद्य दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर येत होती. छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्री होत असताना पोलिसांना अरविंद शिंदे सापडत नव्हते. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अरविंद शिंदे  यांना सापळा रचून  पोलिसांनी  रंगेहात पकडले. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने करत आहेत.