Mon, Sep 16, 2019 11:33होमपेज › Satara › एसटी-डंपर अपघातात 38 जखमी

एसटी-डंपर अपघातात 38 जखमी

Published On: Nov 20 2018 12:57AM | Last Updated: Nov 19 2018 10:35PMवाई : प्रतिनिधी 

बोरगाव, ता. वाई येथे सकाळी एसटी व डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एसटीमधील 38 प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये शालेय व महाविद्यालयीन युवकांसह वृद्धांचा समावेश आहे. जखमींवर येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

याबाबत पोलिस ठाण्यातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सकाळी 7.15 वाजता आकोशीतून वाईकडे निघालेली एस टी (क्र. एमएच 11 टी 9277) व वाईकडून वाळू घेऊन निघालेला डंपर (क्र. एमएच 11 सी एच 2617) यांची बोरगाव येथील दत्तमंदिरानजीकच्या वळणावर सकाळी आठच्या सुमारास जोरदार धडक झाली. या अपघातात एसटीमधील 38 प्रवासी किरकोळ, तर काही गंभीर जखमी झाले. एसटीमधून बोरगाव हायस्कूलचे विद्यार्थी, किसन वीर महाविद्यालयाचे युवक तसेच महिला, वृद्ध ग्रामस्थ प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच बोरगाव ग्रामस्थांनी बसमधून जखमी विद्यार्थी व प्रवाशांना बाहेर काढून मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमींवर उपचार करण्यास विलंब झाल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. मात्र, प्रशासनाने मध्यस्थी करत जखमींवर ताबडतोब उपचार करण्यास सांगितले. 

या अपघातात तुकाराम वाडकर (वयगाव), आनंदा वाडकर (वयगाव), रविंद्र वाडकर (वयगाव), राजाराम बेलोशे (कोंढवली), अजित चोरट (कोंढवली), बाळू वाडकर (वयगाव), बबन कदम (गोळेवाडी), जानू चोरट (कोंढवली), गणपत भणगे (आकोशी), श्रीपती भणगे (आकोशी), संदेश चोरट (कोंढवली), विशाल शिंदे (आसगाव), संतोष शिंदे (आसगाव), रोहित वाडकर (वयगाव), ओंकार जाधव (बलकवडी), रुपेश वाडकर (वयगाव), जानाबाई चोरट (कोंढवली), कविता कात्रट (गोळेगाव), सविता आवकिटकर (गोळेगाव), गंगूबाई शिंदे (आकोशी), फुलाबाई जाधव (कोंढवली), दर्शना धनावडे (दह्याट), साक्षी धनावडे (दह्याट), अमिषा धनावडे (दह्याट), साधना वाडकर (वयगाव), अक्षदा धनावडे (दह्याट), पूजा वाडकर (वयगाव), सोनाली शिंगटे (कोंढवली), ॠतुजा जंगम (वयगाव), निकिता धनावडे (दह्याट), अश्‍विनी पंडीत (वयगाव), मधुमिता निगडे (नांदगणे), चैतन्य जाधव (परतवडी), संकेत गायकवाड (नांदगणे), शुभम गायकवाड (नांदगणे), ओमकार वाडकर (वयगाव), करण जाधव (बलकवडी), तृप्ती जाधव (परतवडी) अशी जखमींची नावे आहेत.

दरम्यान, प्रांताधिकारी सौ. संगिता राजापुरकर, तहसिलदार रमेश शेंडगे, एसटी महामंडळाचे साताराचे विभाग नियंत्रक सागर पळसुले, जिल्हा वाहतूक अधिकारी दत्तात्रय कुलकर्णी, आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ, वाहतूक निरीक्षक अमर शिंदे आदींनी घटनास्थळी व दवाखान्यात जावून जखमींची विचारपूस केली. त्यांच्या औषधोपचाराचा खर्च एसटी महामंडळ करणार आहे. याप्रकरणी डंपर चालक निहाल जाधव याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर शिवाजी गायकवाड (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार यादव करत आहेत.