Wed, Jul 08, 2020 15:08होमपेज › Sangli › झीरो पेंडन्सी आता ग्रामपंचायतींमध्येही

झीरो पेंडन्सी आता ग्रामपंचायतींमध्येही

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 09 2018 11:30PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

‘झीरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ हा उपक्रम आता ग्रामपंचायतींमध्येही राबविला जाणार आहे. त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितींकडील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचा महत्वाकांक्षी उपक्रम म्हणून ‘झिरो पेन्डन्सी डेली डिस्पोजल’ याकडे पाहिले जाते. पुणे विभागातील पाच जिल्ह्यात जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे. कागदपत्रांचे ‘सिक्स बंडल’ पद्धतीत वर्गीकरण करणे, मुदत संपलेल्या कागदपत्रांची विल्हेवाट लावणे व नागरिकांना हेलपाटे मारायला न लावता मुदतीत सेवा देणे, मुदतीत कामे मार्गी लागणे यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण आहे. गतीमान आणि पारदर्शी कारभारासाठी झीरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल महत्वाचे आहे. 

राज्य शासनाने हा उपक्रम गौरविला आहे. सर्व राज्यभर हा उपक्रम राबविला जाणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समितीबरोबरच ग्रामपंचायतींमध्येही झिरो पेन्डन्सी उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये सांगली जिल्हा हा प्रथम असावा याअनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.