Tue, Jul 14, 2020 06:53होमपेज › Sangli › येरळा नदीवरील  पुलासाठी ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर मोर्चा (video)

विटा : येरळा नदीवरील पुलासाठी ग्रामस्थांचा मोर्चा (video)

Last Updated: Nov 22 2019 1:23AM
विटा : वार्ताहर  

रामापूर - कमळापूर या गावांसह कडेगाव व खानापूर या दोन तालुक्‍यांना जोडणारा येरळा नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेला. त्यामुळे दोन्ही गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या पुलाची तात्पुरती डागडुजी न करता पुलाची उंची वाढवून नवीन पूल तयार करावा, या मागणीसाठी आक्रमक बनलेल्या ग्रामस्थांनी आज जोरदार घोषणाबाजी करत विटा तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला. 

यावेळी ग्रामस्‍थांनी प्रशासनाला निवेदन देत चक्क तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच रक्तदान करून मागणीसाठी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. येत्या दोन महिन्यात येरळा नदीवर नवीन पूल न झाल्यास जलसमाधी आंदोलन करू, असा गर्भित इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला.

यावेळी संघर्ष समितीचे प्रमुख अ‍ॅड. दीपक लाड, जयकर साळुंखे, पंचायत समिती सदस्य संजयकुमार मोहिते, सुरेश शिंदे, तानाजी गायकवाड महाराज, शरद यादव, अरविंद गायकवाड, दशरथ साळुंखे, विलास शिंदे यांच्यासह रामापूर व कमळापूर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.