Sat, Dec 07, 2019 10:01होमपेज › Sangli › डंपरने धडक दिल्याने सांगलीत महिला ठार

डंपरने धडक दिल्याने सांगलीत महिला ठार

Last Updated: Oct 17 2019 1:33AM
सांगली : प्रतिनिधी
भरधाव डंपरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने लक्ष्मीबाई तुकाराम भोसले (वय 58, रा. खारे मळा, कुपवाड) ही महिला ठार झाली. त्यांचे पती तुकाराम भोसले (65) किरकोळ जखमी झाले. कुपवाड रस्त्यावर हा अपघात झाला. 

भोसले दाम्पत्य बुधवारी सकाळी दुचाकीवरून मिरजेला निघाले होते. कुपवाड एमआयडीसीतून मिरज रस्त्यावर गेल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने निघालेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.  यात भोसले दाम्पत्य रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. परिसरातील लोकांनी त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. लक्ष्मीबाई  यांच्या डोक्याला मार लागला होता. प्रचंड रक्‍तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असताना त्यांचा दुपारी मृत्यू झाला. याबाबत कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.