Sat, Jul 04, 2020 02:21होमपेज › Sangli › इस्लामपूर : मतदान न करताच झाले मतदान

इस्लामपूर : मतदान न करताच झाले मतदान

Published On: Apr 23 2019 3:31PM | Last Updated: Apr 23 2019 3:31PM
इस्लामपुर : वार्ताहर 

येथील यशवंत हायस्कुलमधील मतदान केंद्र क्र. ९३ मध्ये मतदान न करताच ईव्हीएम मशीन सुरु होऊन आपोआप मतदान झाल्याची तक्रार डाँ. गडदे यांनी केली.  तसेच त्यांना अधिकाऱ्यांनी मतदानही करुन दिले नाही. त्यामुळे गडदे यांनी मतदान केंद्रावर गोंधळ घातला. त्यामुळे तासभर मतदान प्रक्रिया थांबली होती.

गडदे हे आपल्या मुलीसह मतदानासाठी केंद्रावर गेले होते. बोटाला शाई लावून ईव्हीएम मशीन समोर उभा राहिले. मतदान करण्याआधीच मशीन सुरु होऊन मतदान झाल्याचा आवाज आला. आपण मशीनला हातच लावलेला नाही. मग मतदान कसे झाले असा सवाल त्यांनी अधिकाय्रांना केला. मात्र तुम्ही मतदान केले आहे असे अधिकाय्रांनी त्यांना सांगीतले. तरीही आपण मतदान नकरताच मतदान झाल्याची तक्रार करत त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे मतदान प्रक्रियाच काहीवेळ थांबविण्यात आली. यानंतर गड दे यांना व त्यांच्या मुलीलाही मतदान करु दिले नसल्याची तक्रार गडदे यांनी केली आहे.