Mon, Jul 06, 2020 18:39होमपेज › Sangli › पत्नीचा खून; पतीस अटक

पत्नीचा खून; पतीस अटक

Published On: Apr 18 2019 2:10AM | Last Updated: Apr 17 2019 11:41PM
सांगली : प्रतिनिधी

माडगुळे (ता. आटपाडी) येथे आशाबाई अनिल झोडगे (वय 45) या महिलेचा कात्रीने गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. दि. 7 एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी बुधवारी झोडगे यांच्या पतीला अटक करण्यात आली. बारा दिवसांनी या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. 

अनिल सीताराम झोडगे (वय 48) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास झोडगे यांच्या घरात आशाबाई यांचा कात्रीने गळ्यावर वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. खुनानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता. याप्रकरणी काही संशयितांकडे चौकशीही करण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागली नव्हती. 

खून होऊन दहा दिवसांचा कालावधी झाला तरी संशयित न सापडल्याने पोलिसांसमोर या गुन्ह्याचा तपास म्हणजे आव्हान बनला होता. त्यामुळे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी या खुनाच्या तपासासाठी विशेष पथक तयार केले होते.