Fri, Sep 20, 2019 22:18होमपेज › Sangli › पोलीस भरतीच्या सरावादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू

पोलीस भरतीच्या सरावादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू

Published On: Apr 13 2018 9:05PM | Last Updated: Apr 13 2018 9:05PMविटा : वार्ताहर

पोलीस भरतीसाठी मैदानावर सराव करत असताना चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. कोमल दत्तात्रय पवार (वय 20 रा. रेवनागर विटा, जि. सांगली) असे तिचे नाव आहे. ही दुर्देवी घटना आज (दि.13) पावणेपाच वाजता घडली. या मुलीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत विटा पोलिसात डॉ. पाटणकर यांनी वर्दी दिली.

याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, विटा खानापूर रस्त्यावर असणाऱ्या बळवंत महाविद्यालय येथे कोमल रामचंद्र पवार (वय 20 राहणार सुळेवाडी विटा) ही पोलीस भरतीचा सराव करत होती. तिला खेळाची आवड असल्याने ती पोलीस भरतीचा सराव करत होती. आज सव्वाचार वाजण्याच्या सुमारास ती बळवंत कॉलेजच्या मैदानावर धावण्याचा सराव करत असताना अचानक तिला चक्कर आली. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या सहकार्यांनी तिला तत्काळ खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. यावेळी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. तिच्या अचानक झाण्यामुळे विटा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक तपास नानासाहेब सावंत करत आहेत.