Sat, Jul 11, 2020 12:46होमपेज › Sangli › सहकारामुळेच महाराष्ट्राची चौफेर प्रगती : विनय कोरे

सहकारामुळेच महाराष्ट्राची चौफेर प्रगती : विनय कोरे

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 13 2018 9:18PM

बुकमार्क करा
ऐतवडे खुर्द : वार्ताहर

प्रेरणा देणारे विचार लोकांपर्यत पोहोचले पाहिजेत. सहकारामुळेच महाराष्ट्राची चौफेर प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन वारणा उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी केले. 

वारणा महाविद्यालय व  राज्य सहकारी संघ यांच्या वतीने आयोजित राज्य चर्चासत्रात कोरे बोलत होते. राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील  प्रमुख उपस्थित होते.  सहकारी संघाचे उपाध्यक्ष डॉ़. प्रताप पाटील यांनी ज्येष्ठ नेते ( स्व.) बाजीराव बाळाजी पाटील यांचे सहकार चळवळीतील  योगदान या विषयावर  मार्गदर्शन केले. ज्येष्ठ अर्थतज्ञ  डॉ. जे. एफ. पाटील यांनी मानवाच्या विकासासाठी आवश्यक एकमेव व्यवस्था म्हणजे सहकारी चळवळ असल्याचे सांगितले. प्रा. सूर्यकांत गिरी यांनी प्रास्ताविक केले.

सहकार चळवळ ही अनेक विषयांना सामावून घेऊ शकते.सहकारातून माणसे उभी करण्याचे काम  यशवंतराव चव्हाण,  वसंतदादा पाटील, तात्यासाहेब  कोरे,  बाजीराव बाळाजी पाटील,  गुलाबराव पाटील यांनी केले.
- डॉ. व्ही. बी. जुगळे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ