Mon, Jul 13, 2020 12:23होमपेज › Sangli › विटा पालिकेचा कारभार कोणत्या दिशेने?(व्हिडिओ)

विटा पालिकेचा कारभार कोणत्या दिशेने?(व्हिडिओ)

Published On: Dec 28 2017 3:04PM | Last Updated: Dec 28 2017 3:04PM

बुकमार्क करा
विटा : विजय लाळे 

"काम बंदीची नोटीस देऊनही रिलायन्स जिओ कंपनीने न जुमानता ५ किलो मीटर खड्डे खोदले, त्यामुळे नगरपालिकेचा आणि सभागृहाचा अवमान झाला. त्‍यामुळे संबंधित कंपनीवर कारवाई करावी अशी उपसूचना आम्ही मांडली होती. ती सूचना फेटाळण्यात आली. यावरून विटा पालिकेचा कारभार कोणत्या दिशेने चालला आहे याचा सत्ताधाऱ्यांनी खुलासा करावा" अशी मागणी शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर यांचे चिरंजीव अमोल बाबर आणि अमर शितोळे यांनी केली आहे. 

बुधवारी विटा पालिकेची सर्वसाधारण साधारण सभा झाली. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना बाबर आणि शितोळे बोलत होते. बाबर म्‍हणाले, ‘‘या सभेत एकूण ३५ विषय होते. यात विषय क्रमांक ८ मध्ये पालिकेच्या इमारतीच्या उत्तरेकडील  बाजू भाडेतत्वावर देणे, विषय क्रमांक १७ आणि २० मध्ये दलित वस्ती अंतर्गत कामे घेणे आणि १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे करणे असे विषय होते. यांत आम्हाला  ४ उपसूचना मांडायच्या होत्या. मात्र, सत्ताधारी काँग्रेसच्या नगराध्यक्षांनी विरोधी नगरसेवकांना या उपसूचना देखील मांडू दिल्या नाहीत. विशेष म्हणजे याबाबत नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी केवळ मला वाटते म्हणून मी उपसूचना मांडू देणार नाही अशी आडमुठी घेतली. मुळात कोणत्या कायद्याद्वारे आणि कोणत्या आधिकारांत आम्हाला उपसूचना मांडू दिल्या गेल्या नाहीत ते सत्ताधाऱ्यांनी खुलासा करावा.’’

‘‘विटा पालिकेत आम्हा विरोधकांचे सोडून द्या, सत्ताधारी नगर सेवकांनासुद्धा किंमत दिली जात नाही. असा आरोप केला. तसेच दलित वस्ती सुधार मधून शहरातील आंबेडकरनगरातील खुल्या आरक्षित जागेत बौद्ध विहार आणि बगीचा करावा अशी मागणीही बाबर आणि शितोळे यांनी यावेळी केली.