Sat, Jul 04, 2020 01:53होमपेज › Sangli › तासगावमध्ये कृषि औजारांचे गोडावून फोडले : 3 लाख 81 हजारांची चोरी

तासगावमध्ये कृषि औजारांचे गोडावून फोडले : 3 लाख 81 हजारांची चोरी

Published On: Dec 04 2018 1:32AM | Last Updated: Dec 03 2018 11:42PMतासगाव : प्रतिनिधी

तासगाव पंचायत समितीच्या कृषि विभागातील औजारांचे गोडावून अज्ञात चोरट्यांनी फोडून पॅनेलसह 84 सौर कंदील आणि 4 घरगुती सौर दिवे असे जवळपास 3 लाख 81 हजार 500 रुपयांचे साहित्य लंपास केले. चोरीचा प्रकार पंधरा दिवसापूर्वी घडलेला आहे.कृषि विभागाचे लिपीक विजय महादेव कोळी यांनी फिर्याद दिली आहे. तासगाव पोलिस ठाण्यात चोरीप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियांका सराटे करत आहेत.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायत समितीच्या महसूल भवनलगत कृषि विभागाची अनुदानावर देण्यात येणारी औजारे ठेवण्याचे गोडावून आहे. 19 नोव्हेंबर रोजी दुपारी गोडावून उघडण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसापासून ते बंदच होते. सोमवारी  रोजी दुपारी कृषि विभागाचे कर्मचारी गोडावूनमध्ये गेले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी 3 लाख 41 हजार रुपये किंमतीचे पॅनेलसह 84 सौर कंदील आणि 40 हजार 400 रुपये किमतीचे घरगुती सौर दिवे लंपास केले असल्याचे निदर्शनास आले.