Wed, Jun 26, 2019 01:21



होमपेज › Sangli › तर जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही : पडळकर (Video)

तर जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही : पडळकर (Video)

Published On: May 13 2019 4:47PM | Last Updated: May 13 2019 4:47PM




सांगली : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील दुष्काळ निवारनासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. 

गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेत दुष्काळ पहाणीच्या नावाखाली पर्यटन दौरा  करणाऱ्या मंत्र्याना जिल्ह्यात फिरून देणार नाही असा इशारा दिला. गाव तेथे चारा छावणी आणि मागेल त्याला पाण्याचा टँकर देण्यात यावा. तसेच चारा छावण्यात गाढव, घोडा आणि मेंढ्याचा समावेश व्हावा या मागणीसाठी २१ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात येणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली.