होमपेज › Sangli › सांगलीत दारूसाठी मुलाकडून आईचा खून

सांगलीत दारूसाठी मुलाकडून आईचा खून

Published On: Mar 04 2018 9:44PM | Last Updated: Mar 04 2018 9:44PMआटपाडी : प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील पांढरेवाडी-काळीखडी येथे मुलाने दारूच्या नशेत वृद्ध मातेच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. कमल चंदर वाघमारे (वय 70) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा वसंत चंदर वाघमारे (वय, 40) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

अधिक माहिती अशी की, वसंत वाघमारे आणि त्याचे कुटुंबिय आटपाडी तालुक्यात झाडे घेऊन त्याचा कोळसा तयार करण्याचे काम करतात. वसंतला दारुचे व्यसन होते. दारू सोडण्याच्या कारणावरून त्याचे वृद्ध आईशी सतत भांडण व्हायचे. रविवारी सकाळी वसंतचे आईशी दारू सोडण्यावरून पुन्हा जोरदार भांडण झाले. यावेळी वसंत दारू प्यायलेला होता. वादावादी झाल्याने संतापलेल्या वसंत यांने घरातील कोयता घेऊन आईच्या डोक्यात सपासप वार केले. डोक्यात वर्मी घाव लागल्याने कमल वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. काळीखडी परिसर निर्जन असल्याने सायंकाळपर्यंत खुनाची घटना कोणालाही समजली नव्हती. सायंकाळी परिसरातील काही जणांना कमल वाघमारे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मुकादम राजेंद्र चव्हाण यांनी फिर्याद दिली. खुनाची माहिती 
मिळताच पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलगा वसंत यानेच खून केल्याचे समजताच पोलिसांनी त्याला अटक केली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर देढे करीत आहेत.