Sun, Jul 05, 2020 13:09होमपेज › Sangli › सांगलीत आणखी दोन व्यक्तींना कोरोना, तर पलूसमध्ये दिलासादायक चित्र

सांगलीत आणखी दोन व्यक्तींना कोरोना, तर पलूसमध्ये दिलासादायक चित्र

Last Updated: May 31 2020 11:18AM
 
सांगली : पुढारी वृत्तसेवा
दत्त कॉलनी मालगाव रोड मिरज येथील ६७ वर्षीय व्यक्ती व अन्य तीन व्यक्ती (दि २७ रोजी) रूग्णवाहीकेतून मुंबईहून आले होते. त्यातील ६७ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मनदूर (ता. शिराळा) येथील ८१ वर्षीय व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईहून आलेल्या मुलाच्या संपर्कात ही व्यक्ती आली होती. 

जिल्ह्यात आजअखेर पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 112 झाली आहे. उपचाराखालील रुग्णांची संख्या 49 झाली आहे. 

पलूस तालुक्याला मोठा दिलासा

माळवाडीच्या त्या तीन व्यक्ती निगेटिव्ह जिल्ह्यातील पलूस हा एकमेव तालुका कोरोनामुक्त आहे. 
मात्र तीन संशयित व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी घेतल्याने टेस्ट रिपोर्टकडे लक्ष लागले होते. शनिवारी रात्री एकाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. रविवारी दोघांचे अहवालही निगेटीव्ह आले. त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळाला आहे. 

कोरोना अपडेट (31 मे सकाळी 10.30 पर्यंत)

आजचे नवे रूग्ण : 02
उपचाराखालील रुग्ण : 49
आजअखेर बरे झालेले : 59
आजअखेर मृत्यू : 04
चिंताजनक : 03
आजअखेर एकूण पॉझिटिव्ह : 112
पॉझिटिव्हमधील : ग्रामीण- 71, मनपा वगळून शहरी- 28, महापालिका क्षेत्र- 11