Sat, Jul 04, 2020 05:08होमपेज › Sangli › ओ काका ... कोंबडा मारतोय हाक (व्हिडिओ)

ओ काका ... कोंबडा मारतोय हाक (व्हिडिओ)

Published On: Jul 04 2018 7:14PM | Last Updated: Jul 04 2018 7:51PMसांगली : प्रतिनिधी

माणुस आणि पशु-पक्षी यांचं नातं हे पुर्वीपासूनच जवळचं असल्‍याचं दिसून येतं. सांगलीतही असाचं एक कोंबडा आहे, ज्‍याचा आपल्‍या मालकावर इतका जीव आहे की, तो आपल्‍या मालकाला चक्‍क ओ काका.... म्‍हणून हाक मारतो आणि जर मालकदिसले नाहीत तर तो ओ काका... काका अशी हाक मारत राहतो. त्‍याच्या या हाक मारण्याच्या स्‍टाइलमुळं तो परिसरात चांगलाच फेमस झालायं.

सांगलीच्या शंभर फुटी रोडवरील रामकृष्ण परमहंस सोसायटी परिसरात राहणाऱ्या वसंत कांबळे यांच्याकडे हा अनोखा कोंबडा आहे. या कोंबड्‍याच्या मालकाला हाक मारण्याच्या सवयीमुळे तो भागात चांगलाच फेमस झालाय. वसंत कांबळे यांनी या कोंबड्‍याला इतर कोबंड्‍यांप्रमाणे पाळले होते. मात्र, गेल्‍या एक वर्षापासून हा कोंबडा कांबळे यांना काका ओ काका म्‍हणून हाक मारू लागला. सुरूवातीला कांबळे यांनाही कोंबड्‍यांचे अशाप्रकारे हाक मारणे ऐकून अश्चर्याचा धक्‍का बसला. मात्र त्‍याच्या या हाक मारण्याच्या सवयीमुळे कांबळे यांनी त्‍याला न कापण्याचा निर्णय घेतलायं. 

हा कोंबडा गेल्‍या तीन महिण्यांपासून अशी हाक मारत असल्‍याने मालक आणि या कोंबड्‍याचं नात चांगलचं घट्‍ट झालय, ते इतक की मालक सकाळी लवकर दिसले नाहित, की हा कोंबडा मालकाला काका.... ओ काका... म्‍हणून हाका मारायला सुरूवात करतो. मग त्‍याची हाक ऐकू आली की काका घरातून बाहेर येउन त्‍याला खायाला देतात. 

 

मालक आणि कोंबड्‍याचं हे जगावेगळ नात पाहायला आणि कोंबड्याचं अस आपल्‍या मालकाला हाक मारणे पाहण्यासाठी परिसरातील अबालवृध्दांची सकाळपासूनचं हजेरी असते. त्‍यामुळे फार्म हाऊस परिसरात तो सर्वांचाच लाडका झालायं. आपल्‍या कोंबड्‍याच्या  प्रसीध्दीमुळे मालकही खुष आहेत. आता मालकाकडून या कोंबड्‍याची खास बडदास्त ठेवली जाते.