Sat, Jul 04, 2020 21:46होमपेज › Sangli › सांगलीः तासगावात शिवसेनेने नगराध्यक्षांचे दालन फोडले

तासगावात शिवसेनेने नगराध्यक्षांचे दालन फोडले

Published On: Jun 06 2018 2:18PM | Last Updated: Jun 06 2018 2:35PMतासगाव : शहर प्रतिनिधी

वारंवार मागणी करूनही शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही, पालिका पुतळ्याबाबत राजकारण करत आहे, असा आरोप करत शिवराज्यभिषेक दिनीच तासगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली. खुर्च्या फेकून देत काचा फोडल्या आहेत. येत्या ३० जुलैपर्यंत पुतळा न बसवल्यास पालिका पेटवून देण्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला. 

नगराध्यक्षांचे दालन फोडत असताना भाजप नगरसेवकांनी मात्र नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांना एकट्याला सोडून केबिनला बाहेरून कडी लावून पळ काढला. शिवाय राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मात्र नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेतली. दरम्यान, गेल्या ४ दिवसांपासून शिवसैनिक या आंदोलनाबाबत पोलिसांना निवेदन देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांनी निवेदन न स्वीकारल्याने अखेर बुधवारी शिवसेनेने थेट आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला.

नगराध्यक्षांना मारल्याची भाजपकडून अफवा

दरम्यान शिवसेना पालिकेत आल्यानंतर काही नगरसेवक नगराध्यक्षांच्या दालनात होते. वाद सुरू होताच सर्वजण बाहेर आले. त्यातीलच एका नगरसेवकाने बाहेरून कडी लावली व सगळ्यांना फोन करून नगराध्यक्षांना मारहाण होत असल्याची अफवा उठवली, यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे पालिकेसमोर मोठी गर्दी झाली होती.